Call Us: (+91) 022 2543 4331

 

रचनावादी शिक्षणप्रणाली अभ्यासवर्ग

आजपर्यंत मी रचनावादी शिक्षणप्रणालीबद्दल खूप छान विचार ऐकले होते त्यामुळे ह्या शिक्षणप्रणालीच्या अभ्यासवर्गाची फारच उत्सुकता होती.रमेश पानसे सरांनी घेतलेला हा वर्ग सर्वच दृष्टीने सर्वच शिक्षकांसाठी फारच महत्वपूर्ण होता.आजपर्यंत आपण घेतलेले शिक्षण हे वर्तनवादी शिक्षणप्रणालीचा प्रभाव असणारे शिक्षण आहे.वर्तनवादी शिक्षण प्रणालीमध्ये आपल्याला वर्गशिक्षणात विविध घटक आढळून येतात. उदा. शिस्त, शिक्षा, स्पर्धा, बक्षिसे, पाठांतर, गृहपाठ, इत्यादी. या विचारसरणीमुळे मुलांमध्ये भीतीचे प्रमाण वाढले कारण या शिक्षणप्रणालीमध्ये शिक्षा,स्पर्धा,बक्षिसे,पाठांतर,गृहपाठ, शिस्त याना अवांतर महत्व दिले होते. त्यामुळे मुलांमध्ये वेदन,अवधान,स्मृती,निर्णयप्रक्रिया यांची कमतरता भासू लागली. बक्षिसे दिल्याने त्यांचा लोभ वाढू लागला.

वर्तनवादी शिक्षणप्रणाली मधील दोष जाणून घेऊन मनाच्या पातळीवरील क्रिया-प्रक्रियांना महत्व प्राप्त होऊ लागले हा काळ खऱ्या अर्थाने वर्तनवादाकडून आकलनवादाकडे येण्याचा काळ आहे. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञ जें पियाजे असे म्हणतात ^^When you teach a child something you take away forever his chance of discovering it for himself** या काळात पियाजे, ब्रुनर, वायगॉट्स्की यांसारख्या मोट्या लोकांनी शिक्षणक्षेत्रात मोलाची कामगिरी केली

आकलनवादि शिक्षणप्रणालीतुन रचनावादी शिक्षणप्रणालीचा उगम झाला आहे असे बोलणे वावगे ठरणार नाही. शिकणे हि मेंदूची नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि शिक्षण हे अनुभवाने घडत असते.

आकलनवादी शिक्षणप्रणाली मधून महत्वाचे विचार पुढे आले. उदा.मुलांचे पूर्वज्ञान तपासून पाहणे, मुलांना वेगवेगळ्या अनुभवांची संधी देणे . मुलांनी आकलन केलेल्या गोष्टी तपासणे. विकासाचा टप्पा गाठण्यासाठी शारीरिक सिद्धता म्हणजेच पोषण,आहार,विश्रान्ती यांचा समतोल,मुलांसाठी इंद्रियाधारित अनुभवांची रेलचेल,मुले सामाजिक वातावरणातुन जास्त शिकतात,त्यामुळे सामाजिक वातावरण हे मुलांसाठी आवश्यक,आनंदी व ताणविरहित असले पाहिजे.मुलांसाठी शिक्षण हे वयानुरूप व उपयुक्त आशयाचे असले पाहिजे,मुलांसाठी मेंदूआधारित शिक्षण महत्वाचे असते.मुलांना शारीरिक हालचालींचे अनुभव,भाषिक व सांगीतिक अनुभव,बौद्धिक व कल्पकतेचे अनुभव,भावनाबळाचे अनुभव देणे हे शिक्षण क्षेत्रात महत्वाचे ठरले आले.

शाळेत किंवा जीवनात काही गोष्टी चटकन लक्षात येतात.त्याचे आकलन होते पण काही कितीही प्रयत्न केला तरी जमवायला त्रास होतो, ह्याचे उत्तर मिळाले ते बहुविध बुद्धीमत्ता (Multiple Intelligence) हे शिकतांना.

बुद्धिमत्ता हि वेगवेगळ्या प्रकारची असते गणिती- तार्किक, भाषिक, कलात्मक,अवकाशीय, व्यक्तीअन्तर्गत,निसर्ग विषयक इ.ज्याची जी बुद्धिमत्ता आहे ते त्याला चांगले जमते. मेंदू शिकतो म्हणजे काय? तो काम कसा करतो हे जाणून घेणे खूपच हे फारच छान रंजक होते. कोणत्याही प्रकारचा अनुभव देणे व घेणे हे किती महत्त्वाचे आहे हे मेंदू शिक्षणातून प्रकर्षाने जाणवले.मेंदूचा कुठला भाग काय काम करतो हे महत्वाचे शिक्षण मेंदू सत्रातून नीतू बावडेकर ताईंनी दिले.

रचनावादी शिक्षणप्रणालीमुळे वर्गशिक्षणात आमूलाग्र बदल घडत आहेत.रचनावादी शिक्षणप्रणालीमध्ये मुलांचे पूर्वज्ञान तपासून त्यांना नवी माहिती किंवा नवा अनुभव देणे यावर जास्त भर दिला जातो.मुलांना स्वतः शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते कारण दुसर्याने शिकवणे नैसर्गिक नसते,मनुष्य स्वतः शिकत असतो. संधीची निवड करण्याचे स्वातंत्र्य असणे महत्वाचे,या शिक्षणप्रणालीमध्ये मुले आनंदाने शिकतात, त्यामुळे शिक्षण वेगाने होते.वयोमानानुसार विविध अनुभव मुलांना द्यायला हवेत कारण विविध अनुभव मेंदूचे खाद्य असते व त्यामुळे मेंदू तल्लख होतो,शारीरिक हालचालींचे,सतत काहीतरी करण्याचे अनुभव मेंदूला हवे असतात. या शिक्षण प्रणालीमध्ये मुलांना इतरांबरोबर, परस्परांच्या मदतीने व सहकार्याने काम करत शिकण्याची संधी मिळते,तसेच एकत्र शिकण्याने शिक्षण परिपूर्ण होते.

रचनावादी शिक्षणप्रणालीने वर्गशिक्षणात फारच मोलाची कामगिरी केली आहे.या शिक्षणप्रणालीमुळे मला सखोल अध्ययन करून शिकणे,उपक्रमातून शिकणे, अनुभवातून शिकणे व संकल्पनाधारित शिक्षण ह्या सगळ्या पायऱ्यांचा मुलांसाठी वर्गशिक्षणामध्ये कसा उपयोग करता येईल, शिक्षण हे परिपूर्ण कसे होऊ शकेल, मुलांना शिक्षणाचा आनंद मिळू शकेल व हे सारे अमलात आणण्यासाठी एक रचनावादी शिक्षक म्हणून माझी भूमिका वर्गशिक्षणात काय असली पाहिजे हे या वर्गात खऱ्या अर्थाने स्पष्ठ झाले.

कुमुद मोरे

Saraswati Mandir Trust, Thane

saraswati mandir trust thane