Call Us: (+91) 022 2543 4331

 

"रचनावादी शिक्षण प्रणाली अभ्यास वर्ग"

Akshataa Kastureyरचनावादी शिक्षण प्रणालीच्या वर्गाला जाण्यापूर्वी त्याबद्दल फारच उत्सुकता होती. हे नक्की काय असेल? आपल्याला तिथे काय करायला आणि शिकायला मेळेल याची फारच उत्सुकता होती. पहील्याच वर्गात रमेश पानसे सरांनी सांगितलेली ही खालील वाक्येअगदी मनापासून पटली.

* सदैव प्रसन्न राहूया

* प्रसन्न मनाने शिकूया

* शिक्षण हे भावी काळासाठी असत

* शिक्षण हे जीवनाबरोबर जातं

* जीवन बदलत असत म्हणून शिक्षण बदलतं

वर्गाच्या सुरवातीला सांगितलेला वर्तनवादी शिक्षणाचा इतिहास त्या वेळेला केलेले प्रयोग समजून घेतल्यावर आजवर आपण काय करत आलो आणि आपले विचार त्याच पेरलेल्या बिजांचे फलित आहेत, हे उमजले.कुठेतरी आपण चुकतोय असे वाटत होते पण काय हे कळत नव्हते.पण आता ते उमजले आहे.स्वतःच्या कल्पना असू शकतात आणि त्या फुलवण्यात आनंद असतो याचा अनुभव मिळाला नव्हता.शालेय शिक्षण अनुभवातून घेता येते याची कल्पनाच नव्हती.अभ्यास हा पाठ करायचा असतो किंवा अनेकदा लिहून तो पाठ होतो असेच बघत होतो.निबंध दिलेल्या मुद्यांवरच लिहायचा असतो.जसा येईल तसा लिहायचा अनुभवच घेतला नव्हता.

शिकवलेले समजले म्हणजे काय झाले? मग परीक्षेत ते का नाही सोडवता आले हे कळतच नव्हते.पण जेव्हा आकलनवाद वर्गात घेतला तेव्हा कळले.नवीन शब्द समजले. (Schema) प्रतिमा, (Assimilation) माहिती आत घेण्याची प्रक्रिया, (Equilibrium) समतोल, (Disequilibrium) असमतोल, (Accommodation) सामावणे, समजणे.

(Concept)संकल्पना म्हणजे काय? आकलन होतं म्हणजे काय होतं?

  1. वस्तू परत ओळखता येते का
  2. इतर कुठेही उल्लेख केला/ऐकला तरी कळते का?
  3. त्यावर कृती करता येते का?
  4. फरक ओळखता येतो का?

आणि लक्षात आलं,जेव्हा मी मजेत वाचलेली गोष्टीची पुस्तके मला आठवत असतात. बघितलेले सिनेमे हे जास्त चांगले आठवत असतात कारण ते(द्रुकश्राव्य आहे)त्याच प्रकारच्या अनुभवाशी जोडले जात असत.ते का? त्याचे उत्तर आज मिळाले.“ज्या गोष्टी करताना मेंदूला अति ताण येत नव्हता त्या गोष्टी आनंदात होत होत्या. त्यांचे अनुभव घेत मनात त्या शिरत होत्या आणि म्हणुनच त्या जास्त चांगल्या व जास्त काळ स्मरणात राहत होत्या”.

करून, अनुभव घेऊन शिकणे हे होत नसल्याने परीक्षा ह्या प्रकारचा अतिशय भयावह अनुभव होता.आपल्याला असलेल्या शंका ह्या रास्त असू शकतात हा विचार पण होत नव्हता.

शाळेत किंवा जीवनात काही गोष्टी चटकन लक्षात येतात.त्याचे आकलन होते पण काही कितीही प्रयत्न केला तरी जमवायला त्रास होतो, ह्याचे उत्तर मिळाले ते बहुविध बुद्धीमत्ता (Multiple Intelligence) हे शिकतांना.

बुद्धिमत्ता हि वेगवेगळ्या प्रकारची जसे कि गणिती- तार्किक, भाषिक, कलात्मक, कायिक, अवकाशीय, अंतर व्यक्ती, व्यक्तीअन्तर्गत,निसर्ग विषयक इ.ज्याची जी बुद्धिमत्ता आहे ते त्याला चांगले जमते. मेंदू काम कसा करतो हे शिकल्यावर आजवरचे सगळे आयुष्य झरकन डोळ्या पुढून गेले.मुळात मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे हे आत्ता पर्यंत जाणवलंच नव्हत. मेंदू शिकतो म्हणजे काय? तो काम कसा करतो हे जाणून घेणे खूपच आनंदाचे होते.कारण एक व्यक्ती म्हणून, आई म्हणून व शिक्षक म्हणून मेंदू चे कार्य समजणे अतिशय महत्वाचे आहे.

अनुभव देणे व घेणे हे किती महत्त्वाचे आहे हे मेंदू शिक्षणातून प्रकर्षाने जाणवले.मेंदूचा कुठला भाग काय काम करतो हे फारच रंजक व महत्वाचे शिक्षण मेंदू सत्रातून नीतू बावडेकर ताईंनी दिले.

मेंदू शिकताना जाणवले कि आपण तर ह्या पठडीबद्ध प्रक्रियेतून गेलो पण आता आपल्या मुलांना व शाळेतील मुलांना शिक्षणानुभव देतांना,त्यांच्याशी वागताना मेंदूचा केलेला अभ्यास जाणीवपूर्वक आमलात आणायचा जेणे करून मुलांचे शिक्षणाचे क्षण आनंद क्षण होतील.

दिनेश नेहेते सर व ज्योती गायकवाड ताई यांनी घेतलेले मेंदू आणि शिक्षण ह्या वर्गात जोडणी व नव्या अनुभवाची होणारी जोडणी अतिशय उपयुक्त वाटते.मेंदू शिकताना खूप छान वाटले.

मेंदू पोषक शिक्षण उपयुक्त संकल्पना, मेंदूची लवचिकता, त्याला मिळणारी ‘संधीची गवाक्षे’व ‘मेंदूची घसरण’ह्या सागळ्याचा अभ्यास अतिशय उस्तुक्तापूर्ण होता.हे फारच नवीन पण अतिशय रंजक व माहितीपूर्ण होते.

रचनावादी शिक्षक होणे म्हणजे काय? मी आता माझ्या वर्गात, माझ्या घरी कसे वागणार याचा विचार मेंदू करू लागला आहे.रचनावादी शिक्षण देण्यास उपयुक्त अशी अवजारे जसे की मानस नकाशा, संकल्पना नकाशा,विचार नकाशा हे जाणून घेतांना विषय कसा हाताळावा व रंजक करावा हे कळले.रचनावादी शिक्षक होण्यास मला सखोल अध्ययन करून शिकणे,उपक्रमातून शिकणे, अनुभवातून शिकणे व संकल्पनाधारित शिक्षण ह्या सगळ्या पायऱ्या अतिशय सहज करता येणे जरूर आहे.तरच शिक्षण हे आनंदक्षण होऊ शकेल.मुलांना शिक्षणाचा आनंद मिळू शकेल असे वाटते.

अक्षता कस्तुरे

Saraswati Mandir Trust, Thane

saraswati mandir trust thane